ग्रामपंचायत अधिकारी वंदना वाढई यांचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sat 31-May-2025,08:12 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी:गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामविकास कार्यात योगदान दिल्याबद्दल देसाईगंज तालुक्यातील तुळशी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी वंदना सहदेव वाढई यांना २०२३-२४ या वर्षासाठीचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देऊन नुकताच ग्रामविकास व पंचायत राज विभाग कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि गौरवचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांच्या वतिने यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत दि.२७ मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंत्रालय मुंबई येथे अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी कर्मचारी गौरव समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,ग्रामविकास व पंचायत राज विभाग कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे, गृह आणि महसुल ,ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम,राज्यपालांचे सचिव डाॕ.प्रशांत नारनवरे ,राज्यपालांचे उप सचिव एस.राममुर्ती, ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,कोकण विभागीय आयुक्त डाॕ.विजय सुर्यवंशी उपस्थित होते.यावेळी पंचायत राज अभियान २०२५ च्या या गौरव समारंभात सन्मानित झालेल्या अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे गौरव पुस्तिकाचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.